shivkumar varma

टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेते शिवकुमार शर्मा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. शिवकुमार हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच त्यांच्या घरची परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळे शिवकुमार यांना सध्या मदतीची गरज आहे.

टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेते शिवकुमार शर्मा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. शिवकुमार हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच त्यांच्या घरची परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळे शिवकुमार यांना सध्या मदतीची गरज आहे. शिवकुमार यांना आर्थिक मदत करावी असं आवाहन सिने अण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने केलं आहे. सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनिल कपूर, विद्या बालन,सनी देओल यांनी शिवकुमार यांना मदत करावी असं आवाहन टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने केलं आहे.

 

शिवकुमार वर्मा हे क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव्ह पल्मोन डिसीज या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. शिवकुमार यांची प्रकृती नाजूक आहे. से सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. सिंटाने याबबात ट्विटकरत मदतीचं आवाहन केलं आहे. सिंटाने शिवकुमार यांच्या मदतीसाठी ५० हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

सिंटाने ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये शिवकुमार यांच्या आजाराविषयी आणि त्यांच्या बँक अकाऊंट विषयी डिटेल्स देण्यात आले आहेत. ही पोस्ट टाकताना सिंटाने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना टॅग केलं आहे.