‘माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं’, अभिनेता शिवम पाटीलचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप!

“मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. ती सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिनं अनेकदा माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं आहे.

   रिअलिटी शोमधून नावारूपास आलेला मराठमोळा अभिनेता शिवम पाटील सध्या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वर्षांपूर्वी तो ‘अय्यारी’ या चित्रपटात झळकला होता. त्याची भूमिका छोटी होती पण तरीदेखील त्याचं कौतुक केलं होतं. परिणामी आता त्याला आणखी मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अभिनेत्री मेधा शंकरनं केलेल्या आरोपांमुळं त्याला काम मिळेनासं झालं. गेल्या काही काळापासून तो नैराश्येत आहे. पण अखेर त्यानं स्वत:ची संपूर्ण घुसमट सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivam Patil (@shivampatil90)

  तो म्हणाला, “मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. ती सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिनं अनेकदा माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं आहे. माझ्या वस्तु ती तोडायची. ज्या गोष्टींसोबत माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिनं माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. या संपूर्ण प्रकारामुळं मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही करु शकत नव्हतो. कारण मला माझं करिअर संपण्याची भीती वाटत होती. किंबहुना ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती.”

  “पण एकेदिवशी या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळं झालो पण तरी देखील तिनं त्रास देणं सोडलं नाही. जर मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो, कोणाकडे तक्रार केली तर माझं करिअर संपू शकतं. अशी अप्रत्यक्ष धमकीच तिनं मला दिली होती. गेली दोन वर्ष मी नैराश्येत होतो. आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला.” अशा आशयाची पोस्ट त्यानं लिहिली आहे.

  या पोस्टमध्ये त्यानं मेधासोबत सुरु झालेल्या रिलेशनशिपपासून अगदी ब्रेकअपपर्यंतच्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच शिवमनं या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे कायदेशीररित्या तक्रार देखील दाखल केली आहे.