निधनानंतर सिद्धार्थ शुल्काची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट होतोय व्हायरल!

सिद्धार्थने २४ ऑगस्टला इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. आपला एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते.

  अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.  त्यासा कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिद्धार्थची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  काय आहे पोस्टमध्ये

  सिद्धार्थने २४ ऑगस्टला इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. आपला एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. सिद्धार्थ म्हणालेला, सर्व फंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

  १२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सिद्धार्थ हा बिग बॉस १३चा विनर आहे. आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत. सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेतून अनेकांची मनं जिंकली होती. या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.