अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण; रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या जामीनाला उच्च न्यायालयात आव्हान

सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा कथित प्रकार समोर आला होता. या संदर्भात एनसीबीने गुन्हा दाखल करून अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. त्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. मात्र, त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

    मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह अन्य काही आरोपींच्या जामीनाला अंमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने त्यावर ३० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

    सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा कथित प्रकार समोर आला होता. या संदर्भात एनसीबीने गुन्हा दाखल करून अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. त्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. मात्र, त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात अंमली पदार्थविरोधी पथकाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

    शौविकसह अन्य काही आरोपींना देण्यात आलेला जामीन हा अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला असून एनडीपीएस कायदातील कलम ३७ लागू करण्यात आले आहे. त्या कलमातर्गंत जामीन देण्याची तरतूद नसतानाही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यावरच आक्षेप घेत शौविकसह अन्य आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, दोन आरोपींना याचिकेची प्रत न मिळाल्यामुळे त्यांना ती देण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देत खंडपीठाने सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब केली.

    दुसरीकडे, रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनाविरोधात एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावरही लवकरच सुनावणी पार पडणार आहे.