Lockdown मध्ये दिशाबरोबर काररमधून लॉन्ग ड्राईव्हला गेलेल्या टायगरला पोलिसांनी अडवलं आणि…

मागे मालदीव ट्रिपमुळे ते चर्चेत आले होते.  दिशा आणि टायगरने 'बागी 2' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

    बॉलिवूडमधील चर्चेत असणारं नवं कपल टायगर आणि दिशा पाटनी यांना मुंबई पोलिसांनी अडवलं आहे.  लॉकडाऊनमध्ये मुंबईच्या रस्त्यावंरून फिरताना त्यांना अडवण्यात आलं. मुंबईतील बांद्रा,  बँडस्टँड या ठिकाणी हे दोघेही मंगळवारी संध्याकाळी कार मधून राउंड मारत होते. या दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवलं.

    थोडावेळ विचारपूस केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. टायगर आणि दिशा हे बॉलिवूड मधील चर्चेत राहणारी जोडी आहे.

    disha patani and tiger shroff

    दिशा अनेकदा श्रॉफ कुटुंबियांसोबत स्पॉट होते. टायगर आणि दिशा दोघांनीही अगदी कमी कालावधीत बॉलिवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.