लैगिंक क्षमता वाढवण्यासाठी अभिनेत्याने शेअर केले १९ व्यायाम , हे प्रकार दररोज करा आणि सुखी जीवन जगा!

विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीचे व्यायाम पाहता येतील हे सांगितलं आहे.

    अभिनेता विद्युत जामावालचं नाव जगभरातील टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये नुकतच सामील झालय. विद्युत सोशल मीडियावर त्याचे स्टंटचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतो. तसचं त्याच्या यूट्यूब चॅनवरून तो फिटनेस आणि आरोग्यासंदर्भातील महत्वाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. इतर आजारांप्रमाणे लोकांनी आता लैंगिक आरोग्यासंदर्भात मोकळेपणाने चर्चा करण्याची गरज असल्याचं विद्युतने त्यांच्या नुकत्यात शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

    विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीचे व्यायाम पाहता येतील हे सांगितलं आहे. यूट्यूबच्या या व्हिडीओचा टीझर विद्युदने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. १९ व्यायामाचे प्रकार विद्युतच्या यूट्यूब व्हिडीओत पाहता येणार आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

    हा व्हिडीओ शेअर करत तो कॅप्शनमध्ये म्हणाला, “लैगिंक आरोग्याबद्दल चर्चा करण्याची हीच वेळ आहे. सोबतच इरेक्टाइल डिसफंक्शनवर बोलणं गरजेचं आहे कारण दहापैकी एका पुरुषाला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या भेडसावू शकते. तर हे आहे कलारीसूत्र, १९ व्यायामांचा एक संच. रोज या व्यायामाचा सराव केल्यास रक्तप्रवाह वाढण्यास मदत होईल. शिवाय या व्यायामामुळे ओटीपोटाच्या खालच्या भागात लैंगिक शक्ती पुन्हा आणण्यास मदत होईल.” अशी माहिती विद्युतने दिलीय.

    लैंगिक आरोग्य हा निरोगी आयुष्यातील एक प्रमुख भाग आहे. मात्र यावर आता अधिक मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे.” अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय.