rupal nada

मालिकांमध्ये एकत्र काम करणारी जोडपी एकमेकांच्या प्रेमात पडणं हे काही सिनेविश्वात नवीन नाही. अशीच एक नवी जोडी मराठी मालिकासृष्टीत असण्याची शक्यता आहे. ही जोडी आहे, आपल्या निखळ हास्याने सर्व तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा चॉकलेट बॉय यशोमान आपटे आणि गोठ मधून घराघरात पोहचलेली अभिनेतत्री रुपल नंद यांची.

rupal - yashoman

View this post on Instagram

A post shared by Rupal Nand🌼 (@rupalnand)

रुपल आणि यशोमान नुकतेच एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले. रुपल आणि यशोमान सोनी मराठी वाहिनीवरील श्रीमंताघरची सून या मालिकेत एकत्र काम करत आहेत, या मालिकेत देखील त्यांच्या गोष्टीत प्रेमाचा ट्रॅक सुरु आहे. पण चित्रीकरण नसताना सुद्धा हे दोघे एकमेकांबरोबर इतका वेळ घालवत असल्याचे पाहून यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असं काही घडतंय का अशी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे. या आधी सुद्धा यशोमान आणि रुपलने एकत्र काम केले आहे, श्रीमंताघरची सून ही त्यांची एकत्र अशी तिसरी मालिका आहे.

View this post on Instagram

A post shared by Rupal Nand🌼 (@rupalnand)

पण रुपल आणि यशोमान यांच्यात खरंच मैत्रीपलीकडे काही असेल तर अनेक तरुणींचा हृदय भंग होणार आहे मात्र नक्की.