तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री

कॉमेडी मध्ये नंबर एक वर असणाऱ्या तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाला जवळपास १२ वर्ष झाली आहेत. गेल्या अनेक एपिसोड्स पासून ते प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान या काळात मालिकेमध्ये अनेक बदल हे होते गेले आहे.

कॉमेडी मध्ये नंबर एक वर असणाऱ्या तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाला जवळपास १२ वर्ष झाली आहेत. गेल्या अनेक एपिसोड्स पासून ते प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान या काळात मालिकेमध्ये अनेक बदल हे होते गेले आहे. या आधी कार्यक्रमातील महत्त्वाचे पात्र करणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकनी देखील काही वर्षापासून या कार्यक्रमात दिसली नाही आहे. आणि आता या कार्यक्रमात नवीन कॅरेक्टर ची एन्ट्री होणार आहे. या कॅरेक्टरची भूमिका बजावण्यासाठी एका अभिनेत्याची एंट्री होणार असल्याचे समजले आहे. 

अभिनेते  राकेश बेदी यांची लवकरच या मालिकेत एंट्री होणार आहे.  बेदी या मालिकेचा भाग होणार आहेत, याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. या शोमध्ये ते तारक मेहताच्या बॉसची भूमिका निभावताना दिसणार आहेत. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, ‘ मी या शोमध्ये तारक मेहता अर्थात शैलेश लोढाच्या बॉसची भूमिका करणार आहे. ही भूमिका पुस्तकात देखील आहे. ही भूमिका फार महत्वाची आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘यावेळी जेव्हा मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरू झाले तेव्हा मला कॉल आला. मालिकेत काही बदल करण्यात येत आहेत आणि माझ्या भूमिकेला इन्ट्रोड्यूस केले जाणार आहे. माझे कॅरेक्टर या शोचा भाग आधीपासूनच होते, केवळ कधी त्याला इन्ट्रोड्यूस केले नव्हते.’