Actor's post on Instagram Does anyone give such a gift on a birthday? My son left me without cutting my birthday cake

वडीलांच्या निधनानंर नऊ वर्षाचा मुलगा देवराज याच्या निधनामुळे प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगमवर (Rajiv Nigam) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजीवच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवराजचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलासह फोटो शेअर करत राजीव याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट टाकली आहे.

मुंबई : वडीलांच्या निधनानंर नऊ वर्षाचा मुलगा देवराज याच्या निधनामुळे प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगमवर (Rajiv Nigam) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजीवच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवराजचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलासह फोटो शेअर करत राजीव याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट टाकली आहे.

‘वाढदिवसाच्या दिवशी असं गिफ्ट कोणी देतं का? माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच माझा मुलगा मला सोडून गेला.’ अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

राजीवचा नऊ  वर्षाचा मुलगा मागील 2 वर्ष व्हेंटिलेटरवर होता. 2018 मध्ये राजीवने आपल्या मुलाबद्दल ही माहिती दिली होती. अंधेरीतल्या लोखंडवाला इथे राहत्या घरी राजीवच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. राजीवने आत्तापर्यंत ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केले आहे. तसेच कॉमेडी सर्कस के अजूबे, कॉमेडी सर्कस का जादू, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार, ये तो होना ही था अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मुलाच्या आजारपणामुळे राजीव प्रचंड आर्थिक अडचणीतही सापडला होता. कठीण प्रसंगांत मला इंडस्ट्रीमधील कोणीही मदत केली नाही. फक्त मनीष पॉल (Manish Paul)  माझ्या मदतीला धावून आला.  मनीषने मला फक्त आर्थिक सहाय्यच केले नाही तर मला मानसिक आधारही दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Nigam (@rajeev_nigam)