अभिनेत्री आदिती द्रविडचा ९० वर्षाच्या आजीबरोबर ‘RICO RICO’ डान्स, तरूणांना लाजवेल असा उत्साह बघून तुम्हीही हैराण व्हाल!

या व्हिडिओवर आदित्या चाहत्यांबरोबर अनेक सेलेब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. या सेलेब्रेटींसाठी सुद्धाही आजी प्रेरणा ठरतेय. आदिती अनेकदा तिच्या आजीबरोबर व्हिडिओ शेअर करत असते.

    ‘माझ्या नवऱ्याची बायको’ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री आदिती द्रविड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते. या फोटोंची आणि व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चाही होती. मात्र सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आदितीच्या आजीची.

    आदितीने आपल्या सुपर क्यूट आजीबरोबर एक छान व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आदिती आणि आजी डान्स RICO RICO डान्स करतायत. आदितीने शिकवलेल्या स्टेप्स आजी जशाच्या तशा फॉलो करतेय. आजीचा हा उत्साह तरूणांनाही लाजवेल असाच आहे. विशेष म्हणजे आदितीच्या आजीचं वय हे ९० वर्ष आहे. हे सांगूनही कोणाला विश्वास बसणार नाही.

    या व्हिडिओवर आदित्या चाहत्यांबरोबर अनेक सेलेब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. या सेलेब्रेटींसाठी सुद्धाही आजी प्रेरणा ठरतेय. आदिती अनेकदा तिच्या आजीबरोबर व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओला नेहमीच चाहते उत्तम प्रतिसाद देतात.