abhidnya bhave

मराठमोळी अभिनेत्री सई लोकुर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. अभिज्ञा भावेचे सध्या केळवण सुरू असून तिने याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिज्ञा भावेच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काही समजू शकले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई लोकुर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. अभिज्ञा भावेचे सध्या केळवण सुरू असून तिने याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिज्ञा भावेच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काही समजू शकले आहे. अभिज्ञा भावेचे नुकतेच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरी केळवण पार पडले. त्यावेळचे काही फोटो अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तसेच मिताली मयेकर हिने अभिज्ञाचा फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर करत केळवण असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

 

अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला आहे. अभिज्ञाने ‘माझा साखरकारखाना’ असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला होता. अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

 

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रिय असते. फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. २०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.