‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेत अभिनेत्री अंजुम फेखला दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!

'बडे अच्छे लगते हैं' ही एक कौटुंबिक मालिका आहे. या मालिकेत बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत. यात प्रियाची बहीण मैत्रीचं कॅरेक्टर साकारण्यासाठी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री अंजुम फेखला घेण्यात आलं आहे.

    सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘बडे अच्छे लगते हैं’ या गाजलेल्या मालिकेचा दूसरा सीझन लवकरच येणार आहे. निर्माती एकता कपूरनं सांगितल्याप्रमाणं ही मालिका प्रगल्भ प्रेमाचा गौरव करणारी आहे. हि मालिका लग्न झाल्यानंतर हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या वयाच्या तिशीत असलेल्या दोन व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे. दुसर्‍या सीझनमध्ये नकुल मेहता आणि दिशा परमार हे कलाकार अनुक्रमे राम आणि प्रिया या प्रेक्षकांच्या लाडक्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

    ‘बडे अच्छे लगते हैं’ ही एक कौटुंबिक मालिका आहे. या मालिकेत बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत. यात प्रियाची बहीण मैत्रीचं कॅरेक्टर साकारण्यासाठी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री अंजुम फेखला घेण्यात आलं आहे. मागील एक दशकापेक्षा अधिक काळापासून अंजुम विविधांगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करत आहे. याबद्दल अंजुम म्हणाली की, अशा प्रसिद्ध मालिकेचा भाग होताना मला खूपच आनंद होत आहे. या मालिकेतील माझी भूमिका एक अभिनेत्री म्हणून माझ्यातील शक्यतांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करेल याची मला पूर्ण खात्री आहे.