वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला शेती करण्याचा निर्णय, शेतात हळद लावतानाचा फोटो व्हायरल!

अश्विनी महांगडेच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

    सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. या काळात अनेक सेलिब्रिटींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनीही जीव गमावला आहे. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने काहीच दिवसांपूर्वी कोरोनाने आपल्या वडिलांना गमावलं. याची बातमी तिने स्वतःच सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तिने रुग्णलायाचा हलगर्जीपणाही समोर आणला.

    अश्विनी महांगडेच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर अश्विनीने शेतकामाला सुरुवात केली आहे.

    ‘आज हळद लावली. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते त्यातलीच ही एक गोष्ट.’ सोशल मीडियावर अश्विनीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

    अश्विनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे.