गरोदरपणात ९ व्या महिन्यात नवऱ्याने घराबाहेर काढलं, अभिनेत्रीने केले खळबळजनक आरोप!

एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना देखील तो माझ्या मागे मागे असायचा. कोणतीही व्यक्ती एका रात्रीत वेगळं व्हायचा निर्णय नाही घेत. त्यामागे बरीच कारणं असतात.

  गेले काही दिवस अभिनेता करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांच्यातील घरगुती हिंसाचाराचे प्रकरण चांगलच गाजतय. या दरम्यान आणखी एका अभिनेत्रीबाबत चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीने देखील तिच्या दुसऱ्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या अभिनेत्रीचे नाव आहे चाहत खन्ना. चाहत ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by CK (@chahattkhanna)

  चाहतचा पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने फरहान मिर्झा नावाच्या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं होतं. मात्र हे लग्न पण फार काळ टिकलं नाही. पाच वर्षातच चाहत फरहानपासून वेगळी झाली. या दोघांना दोन मुली आहेत. या मुलींच्या वेळी गरोदरपणात फरहानने आपल्यावर बरेच अत्याचार केल्याचे चाहतने एका मुलाखतीत सांगितले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by CK (@chahattkhanna)

  चाहत म्हणाली,  ‘माझ्या दोन्ही प्रेग्नेन्सीमध्ये फरहानने माझ्यावर संशय घेतला. तो मला विचारायचा की हे मूल कुणाचं आहे. दर दोन दिवसांनी तो वेगळ्या व्यक्तीवरून माझ्यावर संशय घ्यायचा. माझ्या लहान भावाशी देखील तो माझं नाव जोडायचा. दुसऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी माझी डिलिव्हरी कोणत्याही क्षणी होऊ शकते हे माहित असतानाही फरहानने मला घराबाहेर काढले होते’ कधीच मला घराबाहेर एकटीला जाऊ द्यायचा नाही. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना देखील तो माझ्या मागे मागे असायचा. कोणतीही व्यक्ती एका रात्रीत वेगळं व्हायचा निर्णय नाही घेत. त्यामागे बरीच कारणं असतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by CK (@chahattkhanna)