अभिनेत्री देवोलिना साकारणार मोलकरणीची भूमिका, सांगितला घरी काम करणाऱ्या बाईचा अनुभव!

या भूमिके विषयी बोलताना देवोलिना म्हणाली,'ही भूमिका साकारण्याआधी मला बराच अभ्यास करावा लागला. मी माझ्या घरातील मेड कडून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेत मी त्या माझ्या भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केला.

  ‘साथ निभाना साथिया’मधील गोपी बहू अर्थात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाश गोयला यांची वेब सीरिज लंच स्टोरीजचा चॅप्टर २- द डेट स्टोरी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ज्यात देवोलिना मोलकरणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

  २०१९ मध्ये वेब सीरिज ‘स्वीट लाय’मधून तीने डिजिटल डेब्यू केला होता. त्यानंतर आता देवोलिनाचि ही माझी दुसरी वेब सीरिज आहे. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वप्न असतात आणि जेव्हा अशा दोन व्यक्ती एकत्र येतात. त्यावेळी काय होतं हे ‘लंच स्टोरी २’मध्ये दाखवण्यात आलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

  या भूमिके विषयी बोलताना देवोलिना म्हणाली,’ही भूमिका साकारण्याआधी मला बराच अभ्यास करावा लागला. मी माझ्या घरातील मेड कडून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेत मी त्या माझ्या भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हाही मी एखादा सीन शूट करत असे त्यावेळी त्यांना नजरेसमोर आणून तो सीन केला. ती याठिकाणी असती तर तिने काय केलं असतं असा विचार करून मी माझा सीन शूट करत होते. असे. माझं माझ्या घरातील मेडसोबत चांगलं बॉन्डिंग आहे ज्याचा फायदा मला या वेब सीरिजसाठी झाला.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)