irfan khan

या चित्रपटातील अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

    चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर व्हर्चुअल पद्धतीने पार पडला. यंदा कोरोना प्रार्दुभावर लक्षात घेता व्हर्चुअल पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या ऑस्करवर ‘नोमाडलँड’ या चित्रपटाने छाप सोडली. या चित्रपटातील अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

    अभिनेत्री फ्रीडा पिंटोने इरफान खान यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. ‘इरफान खान सारखं कुणीच नव्हतं. त्यांचा अभिनय, त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मला केवळ त्यांचे कौतुकच वाटले नव्हते तर मला माझ्या कारकिर्दीत त्यांचे अनुकरण करण्याची इच्छा होती’ असे फ्रीडा म्हणाली. तसेच इरफान यांचे ‘पानसिंग तोमर’, ‘लंच बॉक्स’, ‘मकबूल’ हे चित्रपट तिच्या हृदयाजवळ असल्याचे तिने म्हटले आहे.