hruta durgule 2

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केलय.

टाईमपास या  मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. रवी जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्सन केलं होतं. त्यानंतर टाईमपास २ प्रेक्षकांच्या भेटीला आला, या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच प्रियदर्शन आणि प्रियाच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

आता प्रेक्षकांना टाईमपास ३ बघायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर केले होते. तेव्हापासून टाईमपास ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे. टाईमपास ३ साठी अनेक संहिता रवी यांच्याकडे आल्या असून त्यांनी त्यातून एका संहितेची निवड केली असल्याचे म्हटले जात आहे. टाईमपास या चित्रपटात कोण झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना होती मात्र आता अभिनेत्री ऋता दुर्गुळे टाईमपास ३ मध्ये झळकणार असल्याचं समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केलय. त्याचबरोबर ऋता लवकरच अनन्या या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२० ला प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)