5G टेक्नॉलॉजीला अभिनेत्री जूही चावलाचा विरोध, हायकोर्टात दाखल केली याचिका!

देशभरात ५ G चं तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असं जुहीनं तिच्या याचिकेत म्हटलं आहे.

  गेले काही वर्ष पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सेलेब्रेटी पुढे आले आहेत. अनेक स्टार्स खरोखरच चांगले काम करत आहेत. या यादीत अभिनेत्री जुही चावलाचाही समावेशही आहे. मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होते त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न ती करत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

  देशात आता ५जी नेटवर्क सुरू होणार असल्याच्या चर्चा असतानाच, याविरोधात जुही चावलाने थेट कोर्टाची पायरी चढली आहे. या विरोधात तिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

  देशभरात ५ G चं तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असं जुहीनं तिच्या याचिकेत म्हटलं आहे. यामुळे सामान्य नागरिक, तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा आभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतर या संदर्भात निर्णय घेण्यात यावा, असंही जुहीनं म्हटलं आहे.

  यापूर्वी देखील जुहीने मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर,मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी जुहीने केली होती.