अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईत पोहोचणार

आज (Today) अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) मुंबईत येणार असून हिमाचल प्रदेशमधील मंडी य़ेथून चंदीगढसाठी रवाना झाली आहे. तसेच चंदीगढ येथून कंगना मुंबईसाठी प्रवास सुरू करणार आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने (Actress Kangana Ranaut) महाराष्ट्र (Maharashtra )आणि मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीकेची झोड ओसडत आहे. तसेच मुंबई पोलिसांवर (Mumbai Police)  देखील तिने अविश्वास दाखवल्यामुळे सेलिब्रेटींसह राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत येणार असून हिमाचल प्रदेशमधील मंडी य़ेथून चंदीगढसाठी रवाना झाली आहे. तसेच चंदीगढ येथून कंगना मुंबईसाठी प्रवास सुरू करणार आहे.

मुंबईत येण्यापूर्वी कंगनाचं ट्विट

मी चित्रपटाद्वारे राणी लक्ष्मीबाई यांचे धैर्य, पराक्रम आणि त्याग जगला आहे. आपल्याला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच मी चुकीच्या विरोधात आवाज उठवतचं राहीन. ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे.

कंगना रणौतच्या पहिल्या कोरोना चाचणीचा अहवाल योग्य न आल्याने पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली होती. यावेळी तिचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंदर शर्मा यांनी दिली आहे.