अभिनेत्री करिना कपूरची सीताच्या भूमिकेसाठी १२ कोटींची मागणी?

पौराणीक चित्रपट 'सीता'मध्ये टायटल रोल साकारण्यासाठी करीनाशी संपर्क साधला होता. अलौकीक देसाईंनी काही महिन्यांपूर्वीच बेबोला या चित्रपटात घेतल्याची माहिती मिळाली

    लग्नानंतरच नव्हे, तर बाळंतपणानंतरही, त्यातही दुसऱ्या बाळंतपणानंतरही अभिनेत्री आपली आॅनस्क्रीन व्हॅल्यू कायम राखू शकतात करीना कपूरनं सिद्ध केलं आहे. पहिल्या बाळंपणानंतरही करीनानं आपलं करियर अतिशय कुशल पद्धतीनं शेप-अप केलं आहे. करीनानं आजवरच्या करियरमध्ये करीनानं बरेच ब्लॅाकबस्टर्स दिले आहेत. याच कारणामुळं दुसऱ्या बाळंतपणानंतरही आज तिचं नाव टॅाप फिल्ममेकर्सच्या यादीत आघाडीवर आहे. आजही बरेच फिल्ममेकर्स करीनाचा होकार येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

     सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पौराणीक चित्रपट ‘सीता’मध्ये टायटल रोल साकारण्यासाठी करीनाशी संपर्क साधला होता. अलौकीक देसाईंनी काही महिन्यांपूर्वीच बेबोला या चित्रपटात घेतल्याची माहिती मिळाली, पण यासाठी करीना आपल्या परीनं थोडा वेळ घेत आहे. ‘वीरे दी वेडींग २’ आणि हंसल मेहतांच्या चित्रपटाला ती प्राधान्य देणार असल्याचं समजतं. हे छोटे चित्रपट प्रत्येकी महिन्याभराच्या शेडयूलमध्ये पूर्ण होणारे असल्यानं ते अगोदर पूर्ण करण्याचा करीनाचा विचार आहे. याउलट ‘सीता’ची तयारी आणि चित्रपटासाठी आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

     हा चित्रपट सीतेच्या दृष्टिकोनातून ‘रामायण’ सांगणार आहे. या कारणामुळं सर्वांनाच या चित्रपटाचे वेध लागले आहेत. त्यामुळंच एरव्ही सहा ते आठ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेणाऱ्या करीनानं ‘सीता’साठी १२ कोटी रुपयांची डिमांड केल्याचं समजतं. करीनाच्या या डिमांडमुळं निर्माते मात्र बुचकाळयात पडले आहेत.