kareena kapoor troll for t shirt

सध्या करीना तिच्या एका वेगळ्या लुकमुळे(Kareena Kapoor Troll) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

  सगळ्यांची लाडकी बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor) सोशल मीडियावर सक्रिय असते. करिना सोशल मीडियावर (New Look Of Kareena)तिच्या आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ नेहमी चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या करीना तिच्या एका वेगळ्या लुकमुळे(Kareena Kapoor Troll) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)


  करीनाचा हा फोटो विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत करीनाने एक पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातल्याचे दिसत आहे. करीनाच्या टी-शर्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या शर्टची किंमत तब्बल ५० हजार आहे. टी – शर्टची किंमत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडत करीनाला ट्रोल केले आहे.

  एकाने लिहीले आहे की, ‘अरे थोडे दिवस थांबा हा टी-शर्ट २०० रुपयात लिंकिंग रोडला मिळेल’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘याला मी पुढच्या वर्षी होळीत घालेन’. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मित्रांनो सरोजनी बाजारात ३५० रुपयात हा टी-शर्ट मिळत आहे’. आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘आमच्या इथे ३०० रुपयाला मिळतो हा टी-शर्ट, करीनाची फसवणूक झाली.’ एकाने तर म्हटले आहे की, ‘एवढ्यात ५०० टी-शर्ट विकत घेईन मी’. सध्या सोशल मीडियावर करीनाच्या टी-शर्टचीच चर्चा आहे.