kriti sanon

नितू सिंग, वरूण धवन यांना कोरोनाची लागण झाली असतानाच आत आणखी एक नाव पुढे आलं आहे. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गेले दोन दिवस बॉलिवूडमधून अनेक दु:खद बातम्या येत आहेत. काल दिव्या भटनगरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाशी झुंज देताना तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता,  सूत्रसंचालक मनीष पॉललाही कोरोना झाल्याचं समोर आलं. तसंच तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

तर मोठ्या पडद्यावर नितू सिंग, वरूण धवन यांना कोरोनाची लागण झाली असतानाच आत आणखी एक नाव पुढे आलं आहे. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

काही दिवसांपूर्वीच जुग जुग जियो या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नीतू कपूर, वरुण धवन (Varun Dhawan) यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तसंच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. त्याच फिल्ममध्ये  काम करणारा अभिनेता मनीष पॉललाही (Manish Paul) कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचं लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)