अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई, फॅन्सच्या प्रश्नामुळे ‘असा’ झाला खुलासा!

लिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘क्वीन’ चित्रपटात कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

  ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेली अभिनेत्री लिसा हेडनच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन झालंय. लिसा तिसऱ्यांदा आई झाली आहे. एका गोंडस मुलीला तिनं जन्म दिलाय. ही गोड बातमी लिसानं अजुन तरी जाहीररीत्या सोशल मीडियावर शेअर केली नाही. एका चाहत्याच्या कमेंटला करताना दिलेल्या रिप्लायनंतर ही बातमी सर्व चाहत्यांना कळली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

  अभिनेत्री लिसाने सुरवातीला स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जूनमध्ये ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामूळे तिचे चाहते नवा पाहूण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतू जून उलटला तरी तिने सोशल मीडियावर कोणतीही बातमी कळवली नाही. अखेर एका फॅनने तिच्या पोस्टवर कमेंट करत विचारलं, “आपले तिसरे लहान मुल आता कुठे आहे, ते मला सांगू शकता का?”. फॅनने विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री लिसाने ‘माझ्या हातांमध्ये’ असं उत्तर दिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

  लिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘क्वीन’ चित्रपटात कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लिसाने तिचा बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लग्नगाठ बांधली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)