ऐंशीच्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्री मंदाकिनी करणार कमबॅक!

आता मंदाकिनीला आपलं पहिलं प्रेम असलेल्या अभिनयात कमबॅक करण्याचे वेध लागल्याचं समजतं. चंदेरी दुनियेत कमबॅक करण्यासाठी योग्य प्रोजेक्ट निवडण्यात ती बिझी असल्याची माहिती मिळाली आहे.

    ऐंशीच्या दशकातील गाजलेल्या नायिकांचा उल्लेख येताच मंदाकिनीचा चेहरा अनाहुतपणे डोळ्यांसमोर उभा रहातो. राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या म्युझिकल सुपरहिट चित्रपटातील मंदाकिनीचं ते लोभसवाणं रुप आजही कोणी विसरलेलं नाही. या चित्रपटातील काँट्रोव्हर्सी त्या काळात खूप गाजली आणि मंदाकिनी वन नाईट स्टार बनली. कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा मंदाकिनीवर जीव जडला आणि तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला जणू पुलस्टॉप लागला. मंदाकिनीनं मात्र दाऊदसोबतचं अफेअर नेहमीच अमान्य केलं आहे.

    आता मंदाकिनीला आपलं पहिलं प्रेम असलेल्या अभिनयात कमबॅक करण्याचे वेध लागल्याचं समजतं. चंदेरी दुनियेत कमबॅक करण्यासाठी योग्य प्रोजेक्ट निवडण्यात ती बिझी असल्याची माहिती मिळाली आहे. २००२ मध्ये मंदाकिनीनं ‘से अमर प्रेम’ या बंगाली चित्रपटात काम केलं होतं. सध्या तिचं काही दिग्दर्शकांसोबत बोलणी सुरू असून, काही स्क्रीप्टचं वाचनही सुरू असल्याचं समजतं.

    मंदाकिनीला बऱ्याच मालिकांच्या ऑफर्स येत आहेत, पण सध्या तिला मालिका करायच्या नाहीत. एखाद्या चित्रपटाद्वारे किंवा वेब सिरीजद्वारे कमबॅक करण्याची तिची इच्छा आहे. योग्य प्रोजेक्टची निवड झाल्यानंतर लगेचच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.