mayuri deshmukh

'माझे आशुतोषवर प्रेम आहे आणि ते तसेच राहिल. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.'

    अभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. खुलता कळी खुलेना या मालिकेतून मयुरू घराघरात पोहचली.  सध्या मयूरी स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची मालिनी ही भूमिका करत आहे. लवकरच मयूरीचे ‘डिअर आजो’ हे नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

    मयूरीचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने गेल्या वर्षी, जुलै २०२०मध्ये आत्महत्या केली. पण आता मयुरी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आहे. एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘२०२० हे वर्ष माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबीयांसाठी खूप कठिण होतं. आशुतोष आम्हाला सोडून कायमचा निघून गेला. पण यातून बाहेर पडणे देखील गरजेचे आहे’ असे मयूरी म्हणाली.

    ‘माझे आशुतोषवर प्रेम आहे आणि ते तसेच राहिल. तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.’ मयूरीला जर भविष्यात मुलं हवी असतील तर? असा प्रश्न तिला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर तिने ‘जर तुम्हाला मुलं हवी असतील तर अनेक पर्याय आहेत. तुम्ही दत्तक घेऊ शकता. आणखी देखील खूप पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही लग्न करण्याची आवश्यकता नाही’ असे उत्तर दिले.