अभिनेत्री मीरा जोशीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद, जगातील सर्वात उंचावरील महादेवासमोर केलं नृत्याचे सादरीकरण!

 ट्रेकदरम्यान या भागात चक्क ६ अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वत्र बर्फाच्या चादरी पसरल्या होत्या. मात्र, सुदैवाने या मंदिरा पुढ्यात कमी बर्फ होता. या संधीचा फायदा घेत मीराने तब्बल २ तास नृत्य केले.

    अभिनेत्री मीरा जोशी ही उत्तम नर्तक देखील आहे. मीराने नुकताच एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’मध्ये मीरा जोशीचे नाव कोरोले गेले आहे. तुंगनाथ हे जगातील सर्वात उंचावरील भगवान महादेवाचे मंदिर आहे. भारतातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक असणारे, उत्तराखंडमधील तुंगनाथाचे अर्थात भगवान शिव यांच्या मंदिरासमोर नृत्य सादरीकरण करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

    मीराने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, या संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. तुंगनाथ हे उत्तराखंडमध्ये स्थित शिव मंदिर आहे. १६ मार्चला पहाटे तीनला मीराने या ट्रेकला सुरुवात केली. त्यानंतर सुर्योदयादरम्यान तिथे पोहचून तिने आपली नृत्यसेवा शिव चरणी अर्पण केली.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

    ट्रेकदरम्यान या भागात चक्क ६ अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वत्र बर्फाच्या चादरी पसरल्या होत्या. मात्र, सुदैवाने या मंदिरा पुढ्यात कमी बर्फ होता. या संधीचा फायदा घेत मीराने तब्बल २ तास नृत्य केले. नृत्याच्या आवडीने आणि भगवान शंकराच्या आशिर्वादाने हे शक्य झाल्याचे मीरा सांगते.