लसीकरणाच्या वादावर अखेर अभिनेत्री मीरा चोप्राने दिली प्रतिक्रिया, ट्विट करत दिलं स्पष्टीकरण!

मीरानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी केवळ वॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी लोकांची मदत मागितली होती. जवळपास एक महिना प्रयत्न केल्यानंतर एका सेंटरमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं होतं.

    ठाणे महापलिकेच्या पार्किंग प्लाझामधील कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचे दाखवून अभिनेत्री मीरा चोपडाने लस घेतल्याची माहिती समोर आली. यावर आता खुद्द मीरानं स्पष्टीकरण दिलं आहे. मीरानं ट्विटरवर ट्वीटकरून आपली भूमिका मांडली आहे. बनावट आयडी बनवून लस घेतल्याचा आरोप मीराने नाकारला आहे.

    मीरानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी केवळ वॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी लोकांची मदत मागितली होती. जवळपास एक महिना प्रयत्न केल्यानंतर एका सेंटरमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं होतं. नोंदणी करण्यासाठी पुरावा लागतो. त्यामुळे पुराव्यासाठी माझ्याकडून माझं आधारकार्ड घेण्यात आलं होतं.

    काय आहे प्रकरण?

    ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत मीरानं लसीकरण घेतलं. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेतील भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली. तर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या बाबत संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.

    मीरा चोपडा असे नाव असलेल्या ओळख पत्र आणि संबंधीत सेलिब्रेटीने लस घेतल्यानंतर स्वतःच इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर लस घेतल्याची पोस्ट टाकली. या सर्व प्रकरणा नंतर आता भाजपने पालिका प्रशासनावर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सेलिब्रेटी मीरा चोपडा हिने हे फोटो डिलीट केलेत.