मृणालचा ‘पिप्पा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावरून दिली खास माहिती

या चित्रपटचं शूटिंग मुंबईसह चंदीगडमध्ये करण्यात आलं आहे. 'पिप्पा'चं शूट पूर्ण केल्याची माहिती मृणालनं स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. तिनं लिहीलंय की, या सर्व मजेदार सहकाऱ्यांमुळं या चित्रपटात काम करणंही तितकंच मजेशीर बनलं.

    मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून आघाडीच्या अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिकेत झळकत आहे. काही दिवसांपूर्वी ‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तरसोबत दिसलेल्या मृणालकडे सध्या एक नव्हे, दोन नव्हे, तर जवळपास अर्धा डझन चित्रपट आहेत. नुकतंच तिनं ‘पिप्पा’ असं काहीसं अनोखं टायटल असलेल्या आगामी हिंदी चित्रपटाचं शूट पूर्ण केलं आहे.

    या चित्रपटचं शूटिंग मुंबईसह चंदीगडमध्ये करण्यात आलं आहे. ‘पिप्पा’चं शूट पूर्ण केल्याची माहिती मृणालनं स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. तिनं लिहीलंय की, या सर्व मजेदार सहकाऱ्यांमुळं या चित्रपटात काम करणंही तितकंच मजेशीर बनलं. यातील राधाची व्यक्तिरेखा साकारणं हा एक अद्भूत अनुभव होता. आमच्या टीमकडून बनवण्यात आलेली ही सुरेख कलाकृती प्रेक्षकांनी पाहण्याची मी आतुरतेनं वाटत पहात आहे.

    हा प्रवास पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते असंही मृणालनं लिहीलं आहे. या चित्रपटात मृणालसोबत ईशान खट्टर, प्रियांशू पेन्युली आणि सोनी राजदान यांच्या भूमिका आहेत. युद्धाच्या मैदानावरील दिग्गज ब्रिगेडियर बलराम सिंग मेहतांच्या ‘द बर्निंग चफीस’ या पुस्तकावर आधारीत असलेला हा एक अॅक्शनपॅक्ड युद्धपट आहे. ए. आर. रेहमाननं संगीत दिलं आहे.