अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिसणार ‘मुंबई डायरीज़ 26/11’ मध्ये, या तारखेला सिरीज होणार प्रदर्शित!

मुंबई डायरीज 26/11 एक काल्पनिक मेडिकल ड्रामा असून त्या अविस्मरणीय रात्रीच्या पार्श्वभूमिवर चित्रित करण्यात आला आहे ज्याने शहराला एकजुट केले

    अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज त्यांच्या आगामी अमेझॉन ओरिजिनल सीरीज़ ‘मुंबई डायरीज़ 26/11’ च्या प्रीमियरची घोषणा केली असून 9 सप्टेंबर, 2021 ला प्रदर्शित होणार आहे. निखिल आडवाणी द्वारा निर्मित आणि एम्मे एंटरटेनमेंटच्या मोनिशा आडवाणी आणि मधु भोजवानी द्वारा निर्मित, या मेडिकल ड्रामाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी आणि निखिल गोंसाल्वेस यांनी केले आहे. मुंबई डायरी 26/11 मध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स आणि हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे नवी कथा मांडण्यात येणार आहे, ज्यात 26 नोव्हेंबर, 2008ला शहरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात लोकांचा जीव वाचवण्याचे अथक प्रयत्न केले होते. या सिरीजमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार आहे.

    कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाड़ी सारख्या प्रतिभाशाली कलाकारांसोबत ‘मुंबई डायरीज 26/11’ 9 सप्टेंबर, 2021ला 240 हून अधिक देश आणि प्रदेशात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

    मुंबई डायरीज 26/11 एक काल्पनिक मेडिकल ड्रामा असून त्या अविस्मरणीय रात्रीच्या पार्श्वभूमिवर चित्रित करण्यात आला आहे ज्याने शहराला एकजुट केले. ही सीरीज त्या घटनांचा लेखा-जोखा आहे ज्यातून एक सरकारी इस्पितळातील आपातकालीन कक्ष, तेथील चिकित्सा कर्मचारी आणि त्यांच्यासोबत मुंबई शहरातील नागरिक एका जीवघेण्या संकटातून प्रवास करतात.

    “मुंबई डायरीज 26/11” अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 9 सप्टेंबर, 2021 पासून स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल.