शहरातील सध्याच्या परिस्थितीपासून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतेय ही अभिनेत्री!

शाळेलाही उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे, आम्हांला आमचा असा परफेक्ट फॅमिली वेळ पुण्यातील मुळशी लेक येथील ‘Atmantan’ या हेल्थ आणि वेलनेस रिसॉर्टच्या परिसरात घालवण्यासाठी योग्य आहे.

    हेल्थ इज् वेल्थ’ असं आपण प्रत्येकजण म्हणतो आणि म्हणूनच आपण स्वत:ची काळजी देखील घेतो. सध्याच्या साथीच्या आजारामुळे लोकं शारिरीक, मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जागरुक झाले आहेत आणि हे लक्षात घेता, ८० आणि ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री-ज्वेलरी डिझायनर नीलम कोठारी सोनी यांनी पती- अभिनेता समीर सोनी आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी आहाना यांच्यासोबत घरापासून लांब जरा शांत आणि क्वालिटी फॅमिली टाईम घालवण्याची योजना केली आहे. नीलम कोठारी सोनी गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवरील “Fabulous Lives of Bollywood Lives” मधून प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या.
    शाळेलाही उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे, आम्हांला आमचा असा परफेक्ट फॅमिली वेळ पुण्यातील मुळशी लेक येथील ‘Atmantan’ या हेल्थ आणि वेलनेस रिसॉर्टच्या परिसरात घालवण्यासाठी योग्य आहे.
    “या रिसॉर्टचा प्लॅन समीरने सुचवला आणि विशेष म्हणजे या रिसॉर्टमध्ये लहान मुलांसाठी एक उन्हाळी शिबिर आयोजित आले; ज्यामध्ये कूकिंग, बागकाम, ट्रेंकिंगचे वर्ग आणि अशा ब-याच उपक्रमांचा सहभाग होता. म्हणून आम्हांला वाटले की एकंदरित हे सर्व आमच्यासाठी आणि विशेष करुन आहानासाठी एक वेगळा अनुभव असेल”, असं नीलम यांनी म्हटले.
    साथीच्या आजारामुळे सर्वत्र तणावाचं, चिंताग्रस्त आणि भितीचं वातावरण निर्माण झालेलं त्यामुळे सतत तोच-तोच विचार करुन स्ट्रेस यायचा.  परंतु ‘Atmantan’ येथील वातावरणामध्ये नीलम कोठारी सोनी यांना प्रसन्न वाटलं, मनाला शांतता लाभली.  
    “तणावग्रस्त वातावरणातून दूर जाणे हे कधीकधी महत्त्वाचे असते. सिटी लाईफ खूप बदलली आहे. आपण सहजपणे बाहेर जाऊ शकत नाही, लोकांना भेटायला घाबरतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की, सध्याच्या भितीपासून जरा दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात, हिरवळ जागेत, आनंदी वातावरणात जाणे हे आपल्या मनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरिराची काळजी नक्की घ्यावी पण त्या इतकंच मन ही जपा. डिटॉक्स प्रोग्रामच्या प्रक्रियेत, जर एखाद्याने दोन पौंड गमावले तर… व्हाय नॉट? शेवटी ते सर्वांसाठी चांगलंच आहे. मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्यास आवडेल असं बोलताना नीलम कोठारी सोनी यांनी म्हटले की,  “It Will Be A Mind Detox, Digital Detox, Physical Detox…Everything!”