अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी दिला मुलाला जन्म, डिलेव्हरीच्यावेळी सोबत होता ‘हा’ अभिनेता!

२५ ऑगस्ट नुसरत रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या असता डॉक्टरांनी त्यांना दाखल होण्यास सांगितले. आता २६ ऑगस्टला नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.

    अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. कधी आपल्या वक्तव्यामुळे तर कधी आपल्या फोटोशूटमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. नुकताच नुसरत यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    २५ ऑगस्ट नुसरत रेग्युलर चेकअपसाठी अभिनेता यश दासगुप्तासोबत हॉस्पिटलमध्ये गेल्या असता डॉक्टरांनी त्यांना दाखल होण्यास सांगितले. आता २६ ऑगस्टला नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    नुसरत यांना आई बनतानाचा हा क्षण आणखी स्पेशल बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे एक विनंती केली, डिलिव्हरीच्यावेळी यश दासगुप्ताला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. बाळाला जन्म देत असताना यश दासगुप्ता त्यांच्यासोबत असावा, अशी त्यांची इच्छा होती.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    नुसरत यांनी २०१९ मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.