pooja batra

अभिनेता नवाब शाह(actor nawab shah corona positive) याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे.

    भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती तर अधिक भयावह आहे. मनोरंजन जगतातील अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे.काहीजण दवाखान्यात दाखल झाले आहेत. काहीजण होम क्वारंटाईन आहेत. अशातच अभिनेत्री पूजा बत्रा यांचे पती अभिनेता नवाब शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवाब शाह यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

    अभिनेता नवाब शाह याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली. माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. सगळ्यांनी घरी राहावे व सुरक्षित राहावे.

    पूजा बत्रानेही सोशल मीडियावर आपल्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.