devdatta nage

या मालिकेची अजून एक उजवी बाजू म्हणजे यातील वडील-मुलीचं दाखवलेलं नातं. वडिलांचं मुलीवर असलेलं प्रेम आणि त्यासाठी काहीही करण्याची असलेली त्यांची तयारी. यातील राधा आणि देवा हि बापलेकीची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडतेय. नुकतंच राधाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हिने सोशल मीडियावर तिच्या आणि देवाच्या मालिकेतील एका फोटो सोबत खूप भावनिक पोस्ट शेअर केली.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

या मालिकेची अजून एक उजवी बाजू म्हणजे यातील वडील-मुलीचं दाखवलेलं नातं. वडिलांचं मुलीवर असलेलं प्रेम आणि त्यासाठी काहीही करण्याची असलेली त्यांची तयारी. यातील राधा आणि देवा हि बापलेकीची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडतेय. नुकतंच राधाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हिने सोशल मीडियावर तिच्या आणि देवाच्या मालिकेतील एका फोटो सोबत खूप भावनिक पोस्ट शेअर केली.

त्यात ती असं म्हणतेय कि, “वडील आणि मुलीचं प्रेमाचं नातं हे अद्भुत असतं. आम्ही जरी पडद्यावर वडील आणि मुलीची भूमिका साकारत असलो तरी खऱ्या आयुष्यात देखील ते मला वडिलांच्या जागीच आहेत. माझे बाबा हयात नाहीत म्हणून मी बाबा म्हणणं खूप मिस करत होते. पण देवदत्त नागे यांच्या रूपात नशिबाने मला बाबा हा सुंदर शब्द पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली. मी त्यांना सेटवर या आधी सर म्हणत होते पण एक दिवस त्यांनी मला स्वतःहून त्यांना बाबा म्हणून बोलायला सांगितलं. यापेक्षा जास्त अजून मी काहीच व्यक्त करू शकत नाही.”

या बाप-लेकीच्या ऑन-स्क्रीन नात्यापेक्षा हि घट्ट नातं ऑफ-स्क्रीन आहे आणि म्हणून त्यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री आपल्याला मालिकेत पाहायला मिळते.