राधिका आपटेचा कूल बिकीनी लूक बघून चाहत्यांना आली ‘या’ अभिनेत्रीची आठवण!

सध्या राधिकाच्या बिकीनी फोटोंची चर्चा रंगली आहे. या फोटोंना बघून नेटकऱ्यांना मात्र स्पॅनिश वेब सिरीज मनी हाईस्टमधील नायरोबी या पात्रासारखी राधिका दिसत असल्याचं त्यांच म्हटलं आहे.

  अभिनेत्री राधिका आपटेने आपली एक वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये तयार केली आहे. विविध प्रकारची पात्र साकारणारी राधिका OTT चित्रपटांतील एक महत्त्वाची अभिनेत्री आहे. राधिकाने आज पर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. राधिका अनेकदा तिच्या बोल्ड भूमिकांमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

  सध्या राधिकाच्या बिकीनी फोटोंची चर्चा रंगली आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर बिकीनी आणि लाँग जॅकेट घातलं आहे. या फोटोंना बघून नेटकऱ्यांना मात्र स्पॅनिश वेब सिरीज मनी हाईस्टमधील नायरोबी या पात्रासारखी राधिका दिसत असल्याचं त्यांच म्हटलं आहे. अनेकांनी अशा कमेंट्स तिच्या फोटोवर केल्या आहेत.

  या फोटोंवर नेटकरी फिदा

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Radhika (@radhikaofficial)

  सध्या चाहते मनी हाईट्सच्या ५ व्या सीझनची आतूरतेने वाट बघत आहेत. या वेबसिरीजचे जगभर चाहते आहेत. हा एक स्पॅनिश शो आहे. नुकताच या सिरीजचा पाचवा सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेहमी लढा आणि कधीही आत्मसमर्पण करू नका असं ट्रेलरच्या शेवटी लिहीण्यात आलं आहे. या सीरीजचा ५ वा सीझन खूप महत्त्वाचा आहे. कारण तो शेवटचा भाग असणार आहे.