rakul preet singh

सिनेसृष्टी आता कुठे रुळावर येत असताना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे आपण बघितले. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री क्रिती सेनॉन, अभिनेता मनिष पॉल यांच्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सिनेसृष्टी आता कुठे रुळावर येत असताना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे आपण बघितले. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री क्रिती सेनॉन, अभिनेता मनिष पॉल यांच्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला(rakul preet singh) कोरोनाचा(corona) संसर्ग झाला आहे. रकुलने सोशल मीडिया पोस्टद्वारे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची बातमी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)


रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले आहे की,‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. मला कोणताही त्रास होत नाही आणि मी आराम करत आहे. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करेन’. तसेच  संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहनदेखील तिने आपल्या पोस्टद्वारे केले आहे.