अभिनेत्री रिद्धिमा पंडितच्या आईचे कोरोनामुळे निधन, सोशल मीडियावर लिहिली भावूक पोस्ट!

रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे.

    अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचं कोरोनाने निधन झाले आहे. याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. आपल्या आईला गमावल्याचं दुःख तिने एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

    रिद्धीमा म्हणते, “मम्मा, मॉम्झी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे पण मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तुझ्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी मागे सोडला आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू आमच्यासाठी वेचलंस. त्यासाठी तुझे आभार. मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना हे सांगू शकणार नाही की आईने बनवलेलं गुजराती जेवण पाठवतेय…मी कधी तुझ्याकडून स्वयंपाकही नाही शिकले. कुणास ठाऊक माझी मुलं आता काय खातील? पण मी मात्र स्वतःला अजूनही लहान मूलच समजते. हा विचारही करवत नाही की आता मी तुझ्या हातची चव चाखू शकणार नाही.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

    आपल्या आईबद्दलच्या या पोस्टमध्ये रिद्धिमा पुढे लिहिते, “तुझं नाव आता माझ्या फोनवर फ्लॅश होणार नाही. औषधं घेतली नाहीत म्हणून किंवा वेळेवर नीट जेवली नाहीस म्हणून आता मी तुला ओरडू शकणार नाही. स्वतःला त्रास होत असतानाही आयुष्यातली शेवटची पाच वर्षे तू फक्त माझ्यासाठी जगलीस.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

    रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे. रिद्धिमा ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. २०१९ साली ती ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभागी झाली होती आणि फायनलपर्यंतही पोहोचली होती.