अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक, ड्रग्ज घेत असल्याची दिली कबुली

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.  तसेच अटेकनंतर तिला सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. त्याचसोबतच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या  मृत्यूप्रकरणी  आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.  तसेच अटेकनंतर तिला सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. त्याचसोबतच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी केली असता आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यापूर्वी रियाने ड्रग्स घेत नसल्याचे सांगत होती. इतकच नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्टींबाबत माहिती दिली.

ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह २५ बॉलिवूड कलाकारांना एनसीबी समन्स पाठविणार आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या जबाबात सांगितले की, सुशांत सिंह २०१६ पासून ड्रग्स घेत होता. फिल्म केदारनाथच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. तसेच सुशांतच्या सांगण्यानुसार ती ड्रग्स मागवत होती.