deepika and sara

अभिनेत्री सारा अली खान आता एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे.

मुंबई : जसे दररोज सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात ड्रग्सच्या कोनात भर पडली आहे, बॉलिवूडचे मोठे स्टार आता रडारवर आले आहेत, यामुळे बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, साराअली खान (Sara Ali Khan)  आणि श्रद्धा कपूर यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींची नावे आता ड्रग्जच्या संबंधात समोर आली आहेत.


एनसीबी कार्यालयात दीपिका सकाळीच दाखल झाली आहे. तीची चौकशी सुरु (inquiry begins) आहे. अभिनेत्री सारा अली खान आता एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकासह सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर , रकूल प्रित सिंह नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिका, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर चौकशी करत आहे.