‘मला जगायचं नाही, गळा दाबून मारून टाका’, अभिनेत्रीने मागितला मृत्यू, कारण…

'निशांत', 'नजराना' आणि 'बेटा हो तो ऐसा' या चित्रपटांत तर  'नुक्कड़', 'मायका' आणि 'कवच' या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

    ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज सध्या तिच्या आजारपणामुळे फारच चर्चेत आहे. उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं म्हटलं जातं. तर आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की मला मृत्यु आला तरी चालेल. सविता यांना मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. पण त्यांच्याजवळ कोणीच नाही तर त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत.

    मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “माझी स्थिती फार खराब आहे. माझ्याकडे कोणीही नाही. मी खूप पैसे कमावले होते पण सगळे उपचारांसाठी खर्च झाले. बँकेत केवळ ३५ हजार रुपये होते ते देखील काढले आहेत. गळा दाबून मला मारून टाका , मला असं जीवन नाही जगायचं. यापेक्षा तर मी मेलेली बरी. या जगात माझं कोणी नाही, जो माझी काळजी घेईन.”

    ‘निशांत’, ‘नजराना’ आणि ‘बेटा हो तो ऐसा’ या चित्रपटांत तर  ‘नुक्कड़’, ‘मायका’ आणि ‘कवच’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तर त्यांनी आपलं या जगात कोणीही नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राइटर्स असोसिएशन आणि CINTAA (सिने अँड टेलीविजन आर्टिस्ट असोसिएशन) कडून क्रमशः २ हजार आणि ५ हजार रुपये मदत मिळते. त्यातूनच त्यांचा खर्च चालतो असही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी असही म्हटलं की २५ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या घरी जाण्याचा विचार केला पण कोणीही त्यांना घरी घ्यायला तयार नाही.