‘सुपर डान्सर ४’मध्ये शिल्पाची वापसी, कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे घेतलेला ब्रेक!

हे स्पर्धक, कोरिओग्राफर हे माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहेत. मला या सगळ्यांची खूप आठवण येत होती. अखेर मी आता परत आले आहे. मला पुन्हा नक्कीच या सगळ्याचा आनंद घेता येईल.

    कोरोनाच्या कठीण काळात कुटुंबाबरोबर राहिल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर ४’ मध्ये परतली आहे. ‘सुपर डान्सर ४’मध्ये शिल्पा जजींग करते. तिच्या अनुपस्थितीत मलायका अरोरा जजच्या खुर्चित दिसली.

    शिल्पा आपल्या खास अंदाजामुळे ‘सुपर डान्सर ४’ च्या सगळ्या स्पर्धकांची आवडती जज बनली आहे. त्यामुळे शिल्पाच्या परत येण्याची सगळेच वाट बघत होते. आपल्या परत येण्याविषयी शिल्पा म्हणते “सुपर डान्सर’’ च्या सेटवर परत आल्यामुळे मला खूप आनंद झाला. हे स्पर्धक, कोरिओग्राफर हे माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहेत. मला या सगळ्यांची खूप आठवण येत होती. अखेर मी आता परत आले आहे. मला पुन्हा नक्कीच या सगळ्याचा आनंद घेता येईल.

    लवकरच शिल्पा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा 2’ मध्ये दिसणार आहे.