shivani bavkar, nitish chavan

अभिनेत्री शिवानी बावकर आणि नितीश चव्हाणची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लाडक्या आजा आणि शितलीची जोडी पुन्हा दिसणार म्हणून प्रेक्षकही उत्सुक आहेत.

‘सजलं रूप तुझं, रुजलं बीज नवं

उधाण वारं हसतंय

धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं

पाखरागत उडतंय…..’

सध्या रसिक प्रेक्षकांत रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच  वाढतेय.. आढळून येत आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे प्रेमाचे तरल गीत एका म्युझिक व्हिडिओसह प्रेक्षकांच्या भेटीस आलय… या गाण्यात ‘लागीरं झालं जी’ (Lagir zal jee) फेम शिवानी बावकर (Shivani Bavkar) आणि नितीश चव्हाण (Nitish Chavan)म्हणजेच आपले शीतली आणि आज्याच्या जोडीचा रोमँटिक अंदाजात यात दिसणार आहेत.

 

आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमातच पडतो आणि त्यानंतर तो हरवून जातो. आपल्यासाठी कुणीतरी असणं आणि त्याच्या प्रेमात वेडेपणाचा कळस गाठणं यातलं सुख प्रेमात पडल्याशिवाय उमगत नाही. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारे एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत.

‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत  ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड या मुळे तयार झालेलं हे गाणं तुम्हाला वेड लावेल. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा ‘चाहूल’ या गाण्यातून सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरेल..