अभिनेत्री स्मिता गोंदकरने साडीत खेळले मर्दानी खेळ, Video सोशल मीडियावर व्हायरल!

सध्या स्मिता गोंदकर 'काय घडलं त्या रात्री' या मालिकेत काम करत आहे. अल्पावधीतच तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. या आधी बिग बॉस मराठीमधून स्मिता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी घरातील टास्क खेळण्याची पद्धत, वागण्याची पद्धत प्रेक्षकांना आवडली.

    पप्पी दे पप्पी दे पारूला असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर.स्मिता गोंदकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि नवनवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. तिच्या प्रत्येक लुकचं सोशल मीडियावर कौतुक होतं. नुकताच स्मिताने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती मर्दानी खेळ खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे साडीत ती हा खेळ खेळताना दिसते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

    स्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसत मर्दानी खेळाची एक झलक दाखवली. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिलं की, ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, भीत नाही कोणाला..! कर्तृत्वा संगे धैर्य दिलं राजांनी आमच्या जगण्याला ! मागे हटणार नाही, लाख संकटे आली तरी झुकणार नाही..!’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

    सध्या स्मिता गोंदकर ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत काम करत आहे. अल्पावधीतच तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. या आधी बिग बॉस मराठीमधून स्मिता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी घरातील टास्क खेळण्याची पद्धत, वागण्याची पद्धत प्रेक्षकांना आवडली.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)