अभिनेत्री स्नेहा वाघ शूटींगच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ काढत जपतेय कला!

माझ्या बाबांची इच्छा होती की, माझे हे सर्व स्केच मी पुर्ण करावेत, त्या सर्व पेंटींग्जचे एक्जिबिशन भरवावे. कदाचित पुढे जाऊन त्याचा मी विचार ही करेल

    सुप्रसिद्ध मराठी मालिका ‘काटे रूते कुणाला’ मधून छोट्या पडद्यावर यशस्वी डेब्यू केल्यानंतर, अभिनेत्री स्नेहा वाघ ने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. आपल्या शास्त्रीय नृत्य कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर हिंदी टेलिव्हिजन विश्वात ‘ज्योती’ ने ओळखली जाणारी स्नेहा एक उत्तम चित्रकार देखील आहे. शूटींगच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ का़ढत स्नेहाने आपली चित्रकलेची आवड जपलेली आहे. एक्रेलीक पेंटींग्ज असो वा फ्री हँड स्कॅच असो स्नेहाचे हात कॅनव्हास लिलया फिरतात.
    आपल्या या कलेबद्दल स्नेहा सांगते, “मला रंग खूप आवडतात, रिकाम्या वेळेत मला एखादा कागद मिळाला तर माझ्यातला चित्रकार जागा होतो. मी अनेक रफ स्केच बनवले आहेत, जे मी
    पुर्ण केलेले नाहीत. माझ्या बाबांची इच्छा होती की, माझे हे सर्व स्केच मी पुर्ण करावेत, त्या सर्व पेंटींग्जचे एक्जिबिशन भरवावे. कदाचित पुढे जाऊन त्याचा मी विचार ही करेल !”
    स्नेहाच्या बाबांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या आठवणीत ती भावूक होते.
    स्नेहाला पुन्हा एकदा मराठीत काम करायचे आहे, मराठीत काम करणार का, असे विचारल्यानंतर तिने, मला मराठीत काम करायला नक्की आवडेल असे म्हंटले. आपल्या माणसांसोबत काम करण्याची भावना ही वेगळीच असते. त्यासाठी चांगल्या संधीची वाट पाहत असल्याचे तिने पुढे सांगितले.