sonakshi sinha

'मला घरी आपल्या कुटुंबासोबत राहणं खूप आवडतं. सध्या तरी इथून कुठं दुसरीकडे राहायला जाण्याचा माझा प्लॅन नाही. हे घर मी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सोबतच गुंतवणूक करण्यासाठीही घेतलं आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोनाक्षीनं वडील शत्रुघन सिन्हा यांच्या 'रामायण' या घरात एक मजला रिनोव्हेट केला होता.

नुकतचं सोनाक्षी सिन्हानं मुंबईच्या बांद्राभागातील अपार्टमेंटमध्ये ४ बीएचके फ्लॅट खरेदी केलाय.  हा फ्लॅट घेतल्यामुळे सोनालीचं पहिलं स्वप्न पुर्ण झालं आहे. मात्र सोनाक्षी सध्या तरी त्या घरी रहायला जाणार नाहीये. ती सध्या तरी आई- वडिलांबरोबरच रहाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेली सोनाक्षी सिन्हा आता ३३ वर्षांची आहे. तीला घर घ्यायचं आहे हे ती गेल्या अनेक मुलाखतीत सांगतेय. ती म्हणाली होती, की मी या इंडस्ट्रीत काम करणं सुरू केलं तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं. मी ३० वर्षांची होण्याआधी स्वतःचं घर घेईन असं स्वप्न मी मनाशी पाहिलं होतं. काही वर्षांपूर्वी खरंतर मी स्वतःला घातलेली ही डेडलाईन मिस झाली. मात्र आता हे स्वप्न खरोखर प्रत्यक्षात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

घर सोडण्याबाबत सोनाक्षी म्हणते…

‘मला घरी आपल्या कुटुंबासोबत राहणं खूप आवडतं. सध्या तरी इथून कुठं दुसरीकडे राहायला जाण्याचा माझा प्लॅन नाही. हे घर मी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सोबतच गुंतवणूक करण्यासाठीही घेतलं आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोनाक्षीनं वडील शत्रुघन सिन्हा यांच्या ‘रामायण’ या घरात एक मजला रिनोव्हेट केला होता. इंटिरियर डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर रुपीन सूचक यांनी या मजल्याला रिनोवेट करण्यासाठी सोनाक्षीची मदत केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)