अभिनेत्री- उद्योजिका आणि आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण, तेजस्विनी पंडितचं होतय सोशल मीडियावर कौतुक!

तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले 'क्रिएटिव्ह वाईब' मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही लवकरच उतरणार आहे.

    अभिनयाची उत्तम जाण असलेली तेजस्विनी एक उत्तम उद्योजिकाही आहे. या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या साकारत असतानाच तेजस्विनी आता आणखी एक नवीन जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ च्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

    तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले ‘क्रिएटिव्ह वाईब’ मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही लवकरच उतरणार आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ अंतर्गत सिनेमा, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी ‘क्रिएटिव्ह वाईब’चा पहिलाच प्रोजेक्ट एक मराठी वेब शो असून तो ‘प्लॅनेट मराठी’सोबत केला जाणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

    आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल तेजस्विनी सांगते , ”यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी सर्वार्थाने खास आहे. मी एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहे आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. केवळ आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता मला जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासही नक्कीच आवडेल. त्यामुळे साहजिकच मला सर्जनशील, उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण आशयावर काम करायचं आहे आणि यात मी नवोदितांना प्रामुख्याने संधी देणार आहे. मला साचेबद्ध किंवा एखाद्या चौकटीत अडकून न राहता नवनवीन विषय हाताळायचे आहेत. व्यावसायिक चित्रपट, सिरीज मी करणारच आहे