urmila

शिवसेन्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलय. मातोंडकर यांनी स्वत: ट्वीट करून यांची माहिती दिली. उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.

उर्मिला यांनी इन्स्टाग्रामकडेही याबाबत अधिकृत तक्रार नोंदवली आहे. ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे की, पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि नंतर अकाऊंट हॅक झालं. असं म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर काम सुरू आहे.

९० च्या दशकात अनेक चित्रपट गाजवलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देत त्यांनी स्वतः काँग्रेसपासून बाजूला केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्याने राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे.