डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज व्हा..! विद्याच्या शेरनी चा टीझर रिलीज, ‘या’ दिवशी येणार ट्रेलर भेटीला!

शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे. तर विद्या बालनने लिहिले की, वाघांना त्यांचा मार्ग नेहमीच माहित असतो. डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज रहा.

  अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याचा लूक समोर आला होता. त्याला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे. तर ट्रेलर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  अमेझॉन प्राईमने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काहीही फरक पडत नाही, ती योग्य गोष्टी करेल. २ जूनला ट्रेलर रिलीज होणार आहे. तर शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे. तर विद्या बालनने लिहिले की, वाघांना त्यांचा मार्ग नेहमीच माहित असतो. डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज रहा. ऑफिशिएल टीझर. २ जूनला रिलीज होणार ट्रेलर. शेरनी जून २०२१ला येणार भेटीला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  ‘शेरनी’ या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. टी-सीरीज आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन  पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट ‘न्यूटन’साठी समीक्षकांनी गौरवले होते.