chithu vj

अभिनेत्री VJ चित्रा हिने आत्महत्या केलीये. तिच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडालीये. चित्रा केवळ २८ वर्षांची होती. चैन्नईतल्या एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

गेले काही दिवस कोरोनाची अनेक बॉलिवूड कलाकरांना लागण झाल्याच्या बातम्या समोर येत असतानाच एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अभिनेत्री VJ चित्रा हिने आत्महत्या केलीये. तिच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडालीये. चित्रा केवळ २८ वर्षांची होती. चैन्नईतल्या एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

 

त्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी चित्राचा उद्योजक हेमंत रवि यांच्याशी साखरपुडा झाला होता. त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचीही चौकशी होणार आहे. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत होती. स्टार विजय चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या पांडियन स्टोअर्स (या तमिळ मालिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. यामध्ये ती मुल्लाई ही भूमिका करत आहे. चित्रा देखील नैराश्याचा बळी ठरल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)

 

चित्रा ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होती. याठिकाणी शूटिंग संपल्यानंतर ती रात्री अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये परतली. याठिकाणी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर ती राहत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)

पोलिसांना दिलेल्या एका जबाबात हेमंत यांनी असं म्हटलं आहे की, चित्राने त्यांना ती अंघोळीला जात असल्याचं म्हटलं. मात्र बराच काळासाठी ती परत आली नाही. तेव्हा हेमंत यांनी हॉटेल स्टाफशी संपर्क केला आणि डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला, तेव्हा सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)