zarina khan

बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड, (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप)च्या गेल्या वर्षी मुंबईत लाँच झालेल्या, पहिल्या फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या यशानंतर, आता मुंबईतील पवई येथे अलीकडेच दुसरे फेमिना फ्लाँट स्टुडिओ आउटलेट सुरू केले आहे.

बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड, (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप)च्या गेल्या वर्षी मुंबईत लाँच झालेल्या, पहिल्या फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या यशानंतर, आता मुंबईतील पवई येथे अलीकडेच दुसरे फेमिना फ्लाँट स्टुडिओ आउटलेट सुरू केले आहे. टाइम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप दहिया यांच्यासह फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान ही उपस्थित होती.

फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची ही पहिली फ्रँचायझी आहे. जी केस, मेकअप, नखे आणि त्वचेविषयक सौंदर्य सेवा देताना जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सेवा प्रदान करते. बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान म्हणाली, “फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून पाहून मी खूप प्रभावित झाले. माझ्यासाठी सलून हा एक खास आणि खासगी अनुभव आहे, जिथे प्रत्येक भेटीत आपण 2 ते 3 तास घालवतो. आणि म्हणूनच तेथे डिझाइन, दिलासादायक अनुभव आणि सकारात्मक वातावरण खूप महत्वाचे असते. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनमध्ये, मला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. ”

सौंदर्याचा समग्रतेने विचार करताना फिटनेस आणि पोषण आहाराचा ही समावेश होतो. म्हणूनच या क्षेत्रातही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून, डॉ. मिकी मेहता आणि सांची एस. नायक या तज्ञांसोबत काम करत आहे. नम्रता नाईक (त्वचा आणि नेल केअरची तज्ञ) आणि तनवीर शेख (केसांची निगा राखण्याचे तज्ञ)सह नामांकित सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीबरोबरही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून काम करतात.