‘आदिपुरूष’ चित्रपटातून दीपिकाची ‘एक्झीट’, प्रभासबरोबर चित्रपटात लागली ‘या’ अभिनेत्रीची वर्णी!

या पूर्वी 'आदिपुरुष' या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पदुकोण होती. दीपिका आणि प्रभासने नाग अश्विनच्या चित्रपटाला आधीपासूनच साईन केले होते.

  बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरूष या चित्रपटामधून दीपिका आऊट झाली आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री क्रिति सॅनॉनची वर्णी लागली आहे. तसेच क्रिती सोबत या चित्रपटात सनी सिंग देखील आता या टीममध्ये असणार आहे. क्रितीने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti (@kritisanon)

  या चित्रपटाचा भाग असल्यामुळे दोघेही खूप आनंदी झाले आहेत. क्रितीने सनी, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्रभास, क्रिती आणि सनी पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत आणि क्रिती व सनीच्या चेहऱ्यावर चित्रपटाबद्दलचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की, ‘एका नव्या प्रवासाची सुरुवात. आदिपुरुष. हा चित्रपट खूप खास आहे. या जादुई दुनियेशी कनेक्ट केले आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  या पूर्वी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पदुकोण होती. दीपिका आणि प्रभासने नाग अश्विनच्या चित्रपटाला आधीपासूनच साईन केले होते. अशा परिस्थितीत दोघांनाही बॅक-टू-बॅक एकत्र चित्रपटात दिसायचे नाही.